Thursday, April 23, 2020

आपल्याला सगळ्यांनाच आता समजलंय कि कोरोनाचा लॉकडाऊन वाढलाय. डब्लूएचओ च म्हणणं आपण लक्ष्यात घेतलं तर याचा परिणाम खूप काळापर्यंत राहणार आहे. पण या कोरोनाचे अनेक दूरगामी परिणाम उद्योगांवर , समाजावर लोकमानसावर आणि कुटुंबव्यवस्थेवर होणार आहेत होणार आहेत. उद्योगांवरचे परिणाम आपण पाहूच पण कौटुंबिक परिणामांपासून सुरुवात करू . यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार. सध्या सगळेच कामाला जाणारे पुरुष, लहान मुले , म्हातारी माणसे घरीच असल्याने महिला वर्गाचे काम खूप वाढलय. त्यातही गृहिणीचे त्यांना मुलांना सांभाळायचं; या काळात त्यांची काळजी घ्यायची आणि त्यांचे घरी मनोरंजन करण्याचे कठीण काम येऊन पडलंय. तशातच आपल्या देशात तरुणांचं आणि नवविवाहितांचं प्रमाण लक्षणीय आहे. यासर्वांची आर्थिक परिस्थिती ढासळत असल्याने महिला अत्याचाराचे प्रमाण खूप वाढत आहे आणि ते वाढत जाईल. कारण अजूनही आपल्याकडे कोणतेही फास्ट्र्रेशन महिलांवर काढले जाते. हि एक मोठी बाब लक्ष्यात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे शहरांकडे बघण्याचा दृष्टिकोन यापुढे बदलत जाईल. लोकांना जाणीवपूर्वक आपल्या जीवनात आर्थिक शिस्त आणावी लागेल. शिक्षणाबरोबर आरोग्याच्या बाबींवरचा खर्च वाढत जाईल. यापुढे खूप पैसे मिळवण्यापेक्षा आरोग्य उत्तम राखणे महत्वाचं आव्हान  असेल.
शिक्षणावर खूप खर्च करण्यापेक्षा स्किल वर आधारित शिक्षण घेऊन जवळच्या भागात रोजगार मिळवावा लागेल. छंद जोपासून आपलं जीवन आनंदमय करण्याचा  जाणीवपूर्वक प्रयत्न लोक करताना दिसतील. जेष्ठ नागरिकांना आर्थिक बाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
केदार कुलकर्णी